स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

पुन्हा जन्म मिळणार नाही …

पुन्हा जन्म मिळणार नाही …

पुन्हा जन्म मिळणार नाही
ठाऊक आहे मला
काय हवे ते आजच आता
मागून टाक मला .

स्वप्न पाहणे छंद ना माझा
मी वास्तव वादी
जन्म घेवूनी परत आला
ना पाहिला कधी
पुन्हा जन्म मिळणार अशी
आस नको ही तुला
काय हवे ते आजच आता…..

एकच जन्म पुरे जाहला
संगे सोबत राहू
सातही जन्म याच जन्मी
आपण जगून घेवू
पुन्हा जन्म मिळणार अशी
आस नको ही तुला
काय हवे ते आजच आता…..

उद्याचा रे काय भरवसा
मनी खंत नसू दे
साऱ्या आशा आकांक्षांना
आजच पंख फुटू दे
पुन्हा जन्म मिळणार अशी
आस नको ही तुला
काय हवे ते आजच आता…..

     दि. 14.05.2018
   *श्री.हरेशकुमार ना. खैरे*
   *काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment