शिदोरी...
मायबापाची शिदोरी
तुम्ही जपून ठेवावी
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
मायबापाचे संस्कार
उतरावे जीवनात
या वयस्क माणसांचा
ठेवा आदर मनात.
नातीगोती रे आपली
तुम्ही चांगली जपावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
मायबापाच्या बोलाचे
नाही वाईट वाटावे
असे उद्देश तयांचा
तुझे जीवन घडावे.
त्यांच्या मनाची भावना
आता तुम्ही रे जाणावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
करतात किती बघा
जीवनात आटापिटा
लेक घडावा म्हणून
घेई पोटाला चिमटा.
त्यांच्या तहान भुकेची
जाण मनात असावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
मायबापाची शिदोरी
तुम्ही जपून ठेवावी
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
मायबापाचे संस्कार
उतरावे जीवनात
या वयस्क माणसांचा
ठेवा आदर मनात.
नातीगोती रे आपली
तुम्ही चांगली जपावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
मायबापाच्या बोलाचे
नाही वाईट वाटावे
असे उद्देश तयांचा
तुझे जीवन घडावे.
त्यांच्या मनाची भावना
आता तुम्ही रे जाणावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
करतात किती बघा
जीवनात आटापिटा
लेक घडावा म्हणून
घेई पोटाला चिमटा.
त्यांच्या तहान भुकेची
जाण मनात असावी...
येता संकट जीवनी
तिला हळूच खोलावी.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment