अधुरं स्वप्न
पाहिले स्वप्न झाड होण्याचे
एका छोट्याशा अंकुराने
स्वप्न अधुरं राहिलं
तो अंकुरच खुडल्याने.
पाहिले स्वप्न फुल होण्याचे
एका छोट्याशा कळीने
स्वप्न अधुरं राहिलं
ती कळीच तोडल्याने.
पाहिले स्वप्न उंच उडण्याचे
एका छोट्याशा पाखराने
स्वप्न अधुरं राहिलं
त्याचे पंख छाटल्याने.
पाहिले स्वप्न लांब वाहण्याचे
एका छोट्याशा नदीने
स्वप्न अधुरं राहिलं
तिथे धरण बांधल्याने.
पाहिले स्वप्न सुखी होण्याचे
एका छोट्या शेतकऱ्यांने
स्वप्न अधुरं राहिलं
त्याचे पीक बुडाल्याने.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
पाहिले स्वप्न झाड होण्याचे
एका छोट्याशा अंकुराने
स्वप्न अधुरं राहिलं
तो अंकुरच खुडल्याने.
पाहिले स्वप्न फुल होण्याचे
एका छोट्याशा कळीने
स्वप्न अधुरं राहिलं
ती कळीच तोडल्याने.
पाहिले स्वप्न उंच उडण्याचे
एका छोट्याशा पाखराने
स्वप्न अधुरं राहिलं
त्याचे पंख छाटल्याने.
पाहिले स्वप्न लांब वाहण्याचे
एका छोट्याशा नदीने
स्वप्न अधुरं राहिलं
तिथे धरण बांधल्याने.
पाहिले स्वप्न सुखी होण्याचे
एका छोट्या शेतकऱ्यांने
स्वप्न अधुरं राहिलं
त्याचे पीक बुडाल्याने.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment