घे भरारी...
एक चिमुकली चिमणी
समजाविते बाळा
तू बहादुर पट्टा
नाहीस येळा खुळा.
बाळ बिचारे चिमुकले
उडण्यासाठी धडपडे
उडता उडता थोडे
खाली बदबद पडे.
बाळ बिचारे हताश
नाराज होऊन बसले
आपण उडणार नाही
असेच त्याला वाटले.
चिमणी त्याला समजावी
तू धिर सोडू नकोस
उडू शकतोस तू पण
असा घाबरू नकोस.
चिमणी म्हणाली त्याला
घे भरारी आता उंच
हा आकाशाचा मंडप
आता होईल तुझाच मंच.
चिमणीच्या बोलाने त्याला
आता आला मोठा हुरूप
घेऊन उंच भरारी त्याने
आकाशात मारली झडप.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
एक चिमुकली चिमणी
समजाविते बाळा
तू बहादुर पट्टा
नाहीस येळा खुळा.
बाळ बिचारे चिमुकले
उडण्यासाठी धडपडे
उडता उडता थोडे
खाली बदबद पडे.
बाळ बिचारे हताश
नाराज होऊन बसले
आपण उडणार नाही
असेच त्याला वाटले.
चिमणी त्याला समजावी
तू धिर सोडू नकोस
उडू शकतोस तू पण
असा घाबरू नकोस.
चिमणी म्हणाली त्याला
घे भरारी आता उंच
हा आकाशाचा मंडप
आता होईल तुझाच मंच.
चिमणीच्या बोलाने त्याला
आता आला मोठा हुरूप
घेऊन उंच भरारी त्याने
आकाशात मारली झडप.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment