स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

कसं समजावू वेड्या मनाला

कसं समजावू वेड्या मनाला

कुठे शोधू मी वेड्या मनाला
कसं समजावू वेड्या मनाला

बेधुंद हे झाले
स्वैर-वैर पळाले
काय त्याच्यामध्ये चाले
ना ठाऊक कोणाले
थांग पत्ता ना त्याचा कोणाला
कसं समजावू वेड्या मनाला

क्षणिक असतो जवळ
लगेच पळतो हा दूर
ना त्याचे एकच ठिकाण
सारे विश्वच घर
ना कळत कोठे हा गेला
कसं समजावू वेड्या मनाला

नाही त्याचा भरवसा
कधी काय करेल
तो काय सोडणार
आणि काय धरेल
बरा वाईट अनुभव आला
कसं समजावू वेड्या मनाला

मन वेडे पिसे झाले
नाही त्याच्यावर ताबा
सारं तोच करतो
त्याला कसं म्हणू थांबा
ह्या मनात घोटाळा झाला
कसं समजावू वेड्या मनाला
           
                 दि.11.05.2018
     *श्री. हरेशकुमार ना. खैरे*
      *काटोल,जि. नागपूर*

No comments:

Post a Comment