श्रावणसरी
आला श्रावण महिना
श्रावणसरी घेऊन
आता सुखावले डोळे
रान हिरवे पाहून !
श्रावणसरीचा पहा
कसा वर्षाव हा झाला
उष्ण वातावरणात
आता थंडावा आला !
श्रावणसरीत चला
आता आनंदाने न्हाऊ
रिमझिम पावसात
मिळून आपण गाऊ !
श्रावणसरी बरसे
मोर नाचे थूई थूई
लगबग हो कामाची
बळीराजाला हो घाई !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
आला श्रावण महिना
श्रावणसरी घेऊन
आता सुखावले डोळे
रान हिरवे पाहून !
श्रावणसरीचा पहा
कसा वर्षाव हा झाला
उष्ण वातावरणात
आता थंडावा आला !
श्रावणसरीत चला
आता आनंदाने न्हाऊ
रिमझिम पावसात
मिळून आपण गाऊ !
श्रावणसरी बरसे
मोर नाचे थूई थूई
लगबग हो कामाची
बळीराजाला हो घाई !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
No comments:
Post a Comment