स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

भाग्यविधाता

भाग्यविधाता

जीवन सारे मोडून पडले
कोण उठविल आता
भीमसूर्य तळपत आला
तोच भाग्यविधाता ! धृ !

जीवनात नव्हता रस
कुणीही म्हणे उठ, बस
माणसात माणूस नाही
शिक्षण होते दूर कोस
जीवनात या रंग आला
तूच मार्गदाता            !१!
भीमसूर्य तळपत आला.....

ज्ञानाचीही सारी दारे
बंद आमच्यासाठी
वर्गाच्या बाहेर बसला
ज्ञान वेचण्यासाठी
अपार कष्ट करून तुम्ही
ठरले ज्ञानदाता           !२!
भीमसूर्य तळपत आला.....

दाही दिशांनी जखडून होता
आमचा समाज सारा
हाल असे की लाजही वाटेल
त्या ढोरा जनावरा
बंधन सारे तोडून तुम्ही
ठरले मुक्तीदाता         !३!
भीमसूर्य तळपत आला.....

मानव सारे एक असावे
ही एकच इच्छा तुमची
जात, धर्म, पंथ, वर्ण
हे शत्रू या देशाची
संविधानाने दिली तुम्ही
न्याय, स्वातंत्र्य, समता !४!
भीमसूर्य तळपत आला.....
             
                हरेशकुमार ना. खैरे
                काटोल,जि. नागपूर

No comments:

Post a Comment