उरल्या त्या आठवणी
तू जरी मजला सोडून गेली
तुझ्या स्मृती या कोरल्या मनी
आठवण येते ही क्षणोक्षणी
आता उरल्या त्या आठवणी.
सहवास तुझा लाभला मजला
नाही कुरकुर कसली आजला
गेलीस का अशी मला सोडूनी
आता उरल्या त्या आठवणी.
होती हवी साथ जन्मभराची
आठवण येते क्षणाक्षणाची
का तू गेलीस परत फिरूनी
आता उरल्या त्या आठवणी.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
तू जरी मजला सोडून गेली
तुझ्या स्मृती या कोरल्या मनी
आठवण येते ही क्षणोक्षणी
आता उरल्या त्या आठवणी.
सहवास तुझा लाभला मजला
नाही कुरकुर कसली आजला
गेलीस का अशी मला सोडूनी
आता उरल्या त्या आठवणी.
होती हवी साथ जन्मभराची
आठवण येते क्षणाक्षणाची
का तू गेलीस परत फिरूनी
आता उरल्या त्या आठवणी.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment