स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

माझ्या भिमाच्या श्रमानं

माझ्या भिमाच्या श्रमानं

माझ्या भिमाच्या श्रमानं
झाली घटना महान !

आता किती मी वर्णावी
आपल्या घटनेची महती
तिच्यामुळेच लोकं सारे
येथे सुखाने नांदती
झाले सारेच समान
झाली घटना महान...

या घटनेत साऱ्यांना
देवून मतदानाचा हक्क
पहा साऱ्याच जगाला
केले भिमरावाने थक्क
वागे सारेच न्यायानं
झाली घटना महान...

येथे अनेक जाती धर्म
सारे एकत्र गुंफले
राहण्याचे बोलण्याचे
स्वातंत्र्य बहाल केले
बंधुभाव तो जपून
झाली घटना महान...

           :- हरेशकुमार ना. खैरे
              काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment