स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

तुझ्या रूपाचं चांदणं

*तुझ्या रूपाचं चांदणं*

तुझ्या रूपाचं चांदणं
माझ्या मनात गोंदलं
तुझ्या सहवासात हे
माझं जीवन फुललं.

तुझ्या रूपाच्या चांदण्यात
उजळला आसमंत
तुझी साथ जीवनात
साऱ्या जगात मी श्रीमंत.

तुझ्या रूपाचं चांदणं
माझ्या जीवनात पडलं
या अंधारी जीवनाचं
सारं गुपित कळलं.

तुझ्या रूपाच्या चांदण्यात
वाटे बसावे निवांत
माझ्या मनाची घालमेल
येथे करावी ती शांत.

तुझ्या रूपाच्या चांदण्याने
दुःखे सारीच पळाली
झाली नवीन पहाट
सुखे सारीच मिळाली.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
23/11/2018

No comments:

Post a Comment