स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

प्रेमपाखरू

प्रेमपाखरू

मनात माझ्या प्रेमपाखरू
हळूच डोकावले
त्याने प्रेमजगाचे
दारच ठोठावले ।धृ।

सिधा-साधा स्वभाव माझा
कामाशी काम
मुलगी दिसली समोर असली
फुटतो घाम
पाहून तिला आज माझे
डोळे चमकले
त्याने प्रेमजगाचे
दारच ठोठावले ।१।

चेहरा हसरा सुंदर दिसला
चंद्रच भासला
सुंदर बांधा लांब केसात
जीव माझा गुंतला
पाहून तिची चाल हरिणीची
पायच थबकले
त्याने प्रेमजगाचे
दारच ठोठावले ।२।

*22.7.2018*
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment