स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

नभवलय

नभवलय

नभवलय हे आले
धावत आकाशात
हर्षित झाले सारे
मानव मनामनात ।

लाही लाही झाली धरती
सूर्याच्या प्रकाशाने
चिंब भिजली शांत जाहली
पावसाच्या सरीने
सुंदर सुंदर पहा उमटली
नक्षी आकाशात
हर्षित झाले सारे
मानव मनामनात ।

नभवलय कधी काळे-काळे
कधी पांढरे शुभ्र
जणू कापूस पसरलाय
आकाशात निरभ्र
नभवलयाचा सुंदर रंग
पसरला आकाशात
हर्षित झाले सारे
मानव मनामनात ।

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment