स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

रंग प्रितीचे...

रंग प्रितीचे...

त्या रंगात प्रितीच्या
आज मला रंगू दे
पावसात प्रितीच्या
आज मला न्हाऊ दे.

प्रितीच्या पावसाच्या
धाराच कोसळू दे
त्या धारांच्या पूरात
मी वाहून जाऊ दे.

या प्रितीच्या रंगाने
माझे मन भिजू दे
अनुभव प्रितीचा
आज मला होऊ दे.

      हरेशकुमार ना. खैरे
      काटोल,  जि. नागपूर

No comments:

Post a Comment