स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

दिपपर्व

*दिपपर्व*

जिकडे तिकडे प्रकाश उधळी
या दिपपर्वावर
थोडासा तर प्रकाश पडू द्या
आपल्या या मनावर !

दिपमाळांची रोषणाई
हा भुर्दंड खिशाला
विजेची ही उधळपट्टी
कारण लोडशेडींगला !

दिव्यांचा तो गुण शिका रे
जो जळतो दुसऱ्यासाठी
स्वतः जळूनी दुःख साहुनी
जो जगतो दुसऱ्यासाठी !

फटाक्यांचा चाले धुमाकूळ
आवाज मोठमोठे होई
गुदमरतो हा जीव कासावीस
हवा प्रदुषित होई !

प्रकाश पसरा हा ज्ञानाचा
समाज घडवण्यासाठी
स्वतः बदला जगही बदला
या मानव कल्याणासाठी !

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
*दि.२५/१०/२०१८*

No comments:

Post a Comment